Tue, Mar 19, 2019 11:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रेल्वेचा प्रवास आता सुपरफास्ट होणार

रेल्वेचा प्रवास आता सुपरफास्ट होणार

Published On: Jan 25 2018 1:48AM | Last Updated: Jan 25 2018 1:26AMमुंबई : प्रतिनिधी

रेल्वेचा प्रवास लवकरच सुपरफास्ट होणार आहे. येत्या जूनपासून सामान्य रेल्वेपेक्षा 20 टक्के अधिक गतीने धावणारी ‘ट्रेन 18’ प्रवाशांच्या सेवेत लवकरच दाखल होणार आहे. या गाडीत प्रवाशांना वाय-फाय, जीपीएसवर आधारित पॅसेंजर इन्फोर्मेशन सिस्टिम आणि एलईडी लायटिंगसारख्या अद्ययावत सोयीसुविधा मिळणार असून, ही गाडी शताब्दी एक्स्प्रेसची जागा घेणार आहे.

‘ट्रेन 18’ला 16 वातानुकूलीत डबे असणार असून, ही गाडी चेन्‍नईतील रेल्वे इंटिग्रल कोच कंपनीत तयार होत आहे. या गाडीनंतर 2020 मध्ये ‘ट्रेन 20’देखील दाखल होणार आहे. ही रेल्वेगाडीदेखील सोयीसुविधांनी युक्‍त असणार असून, राजधानी एक्स्प्रेसची जागा घेणार आहे. मेक इन इंडिया या अभियानांतर्गत या दोन्ही गाड्यांची निर्मिती सध्या सुरू आहे. या स्वदेशी बनावटीच्या गाड्यांची किंमत परदेशातून आयात होणार्‍या रेल्वेगाड्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. या दोन्ही गाड्यांत फक्‍त एकच फरक आहे तो म्हणजे ‘ट्रेन 18’ या गाडीची बॉडी स्टेनलेस स्टील, तर ‘ट्रेन 20’ या गाडीची बॉडी अ‍ॅल्युमिनियमची असणार आहे.

प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी रेल्वेने अलिकडे आसन व्यवस्था कमालीची सुधारली आहे. यापुढील नव्या रेल्वे अशाच आरामदायी असतील.