Wed, Sep 26, 2018 20:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-अहमदाबाद मार्गावर गॅस टँकर पलटल्याने वाहतूक कोंडी

मुंबई-अहमदाबाद मार्गावर गॅस टँकर पलटल्याने वाहतूक कोंडी

Published On: Jan 25 2018 3:41PM | Last Updated: Jan 25 2018 3:41PMमीरारोड : प्रतिनिधी

मुंबई अहमदाबाद मार्गावर गॅस टँकर पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी  पर्यायी मार्गांवरुन वाहतूक वळवली आहे.

मुंबईकडून काशीमिरा मार्गे गुजरातकडे जाणारी वाहने नाशिक रोडकडून भिवंडी मार्गे वळवण्यात आली आहेत. तर ठाणे घोडबंदरकडून गुजरातकडे जाण्यासाठी नाशिक हाइवे-भिवंडी मार्गे व्यवस्था केली आहे. ठाण्याकडून घोडबंदर मुंबईकडे मुलुंड - घाटकोपर मार्गे मुंबईत जावे असे आवाहन ठाणे ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत कदम यांनी वाहन चालकांना केले आहे.