Wed, Nov 21, 2018 17:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई : सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी

नवी मुंबई : सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी

Published On: Dec 13 2017 11:51AM | Last Updated: Dec 13 2017 11:51AM

बुकमार्क करा

नवी मुंबई : प्रतिनिधी 

सायन पनवेल महामार्गावर उरणार फाट्याजवळ आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एलपीजी गॅस टॅंकर पलटी झाला. यामुळे पाहाटेपासूनच या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. 

आज सकाळी अचानक ट्रक उलटल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याने अनेक वाहने ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडली आहेत. यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

या अपघातामुळे ठाणे बेलापूरला मार्गावर तुर्भे उड्डाण पुलापर्यत आणि पनवेल कडे जाताना खारघर टोलनाक्यापर्यत वाहतुक कोंडी झाली आहे. पामबीच मार्गावर वाहतूक वळवल्याने सीबीडी जंक्शन, भाऊ पाटील चौक ट्रक जाम झाला आहे.