Sat, Sep 22, 2018 14:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टोईंगचे नवे नियम जारी!

टोईंगचे नवे नियम जारी!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : वृत्तसंस्था

टो करून गाडी उचलून नेण्याबाबत वाहतूक विभागाकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. यामध्ये वाहनधारकांचा विचार करून अनेक नव्या नियमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

नो पार्किंग क्षेत्रात एखादे वाहन उचलत असताना त्या वाहनाचा मालक तेथे आल्यास दंडाची रक्कम आणि टोईंग शुल्क आकारून ते वाहन सोडण्यात येणार आहे. तसेच गाडी टो करण्यापूर्वी ध्वनिक्षेपकावरून गाडी काढण्यासाठी एकदा सूचनाही देण्यात येणार आहे. याशिवाय, एखादी गाडी नो-पार्किंग क्षेत्रात उभी असेल; पण गाडीचा चालक आतमध्ये बसला असेल, तर ती गाडी उचलता येणार नाही.

या गाड्या उचलण्यासाठी पोलिसांना मदत करणार्‍या कर्मचार्‍यांनी संबंधित वाहनाच्या मालकाशी गैरवर्तन करू नये किंवा उद्धटपणे वागू नये, असे या नियमावलीच्या परिपत्रकात म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईसह अन्य शहरांमध्ये टोईंगवाल्यांच्या मुजोरीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता प्रत्येक टोईंगच्या गाडीसोबत पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारीही तैनात करण्यात येईल. या अधिकार्‍याने सांगितल्यानंतरच वाहन उचलले जाईल. तसेच प्रत्येक टोईंग व्हॅनमध्ये ई-चलान मशिन, मेगाफोन आणि वॉकी-टॉकी ही उपकरणे ठेवण्याच्या सूचना वाहतूक विभागाने दिल्या आहेत.