Thu, Aug 22, 2019 13:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाशी खाडी पुलावरील टोलआकारणी 2036 पर्यंत

वाशी खाडी पुलावरील टोलआकारणी 2036 पर्यंत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नवी मुंबई : राजेंद्र पाटील

मुंबई-नवी मुंबईला जोडणार्‍या वाशी खाडीवर तिसरा पूल बांधण्याच्या 775.58 कोटी रुपयांच्या खर्चाला मंत्रीमंडळ पायाभूत समितीकडून शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर या मार्गावर आकारण्यात येणार्‍या टोललाही 2036 पर्यंत मान्यता देण्यात आली आहे. आता टोलमध्ये पथकर धोरणानुसार बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनधारकांना अधिक टोलही घ्यावा लागू शकतो.

मागील 15 ते 20 वर्षात मुंबई व नवी मुंबईच्या क्षेत्रातील वाहतुकीत प्रचंड वाढ झाली आहे. सायन-पनवेल रस्ता हा विशेष राज्यमार्ग दर्जाचा असून हा मुंबई व नवी मुंबईतील नागरी व एमआयडीसी भागातून जात असून मुंबई-पुणे दु्रतगती मार्ग, मुंबई-पुणे व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. या खाडीवर 1970 मध्ये पहिला चौपदरी पूल बांधण्यात आला. वाहनांची वर्दळ वाढल्याने दुसरी पूल बांधून तो नोव्हेंबर 1994  पासून वाहतुकीस खुला करण्यात आला. 

या ठिकाणच्या सध्याचा व भविष्यातील 20 वर्षाची वाहतुक वर्दळ वाढ लक्षात घेवून आय.आर.सी मानकाप्रमाणे वाहतुकीचा सेवादर्जा तपासला असता तो (एफ) आढळला असून तो मर्यादेपेक्षा म्हणजे टिकाऊमध्ये (सी) मानकापेक्षा ही खूपच कमी असुन भविष्यात हा दर्जा आणखी खालावण्याची शक्यता बांधकाम विभागाने व्यक्त केली. 

शिवाय वाहतूक बंद करुन पुल दुरुस्ती करणे अशक्य असल्याने नवीन तिसरा पुल बांधणे गरजेचे असल्याचे मत बांधकाम विभागाने स्पष्ट केले. हा प्रकल्प एमएसआरडीसी तयार करण्याची सर्व जबाबदारी ही एमएसआरडीसीची असणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने एमएसआरडीसीला उद्योजक म्हणून नियुक्त करण्यास मान्यता दिली आहे. 
2 फेबु्रवारी रोजी एमएसआरडीसीने सरकारला आपला अहवाल सादर केला होता. त्या अहवालानुसार शुक्रवारी बांधकाम विभागाने वाशी खाडीवरील तिसरा पूल बांधण्यासचा आद्यादेश काढला.