Sun, Mar 24, 2019 04:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्नाळा किल्ला ट्रेकिंगला पर्यटकांची पसंती (Video)

कर्नाळा किल्ला ट्रेकिंगला पर्यटकांची पसंती (Video)

Published On: Mar 13 2018 9:52AM | Last Updated: Mar 13 2018 9:54AMठाणे : अमोल कदम

पनवेल शहरापासून काही अंतरावर्ती कर्नाळा किल्ला असून त्याच्या आजूबाजूचा परिसर पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. सुट्टीच्या दिवशी या किल्यावर पर्यटक ट्रेकिंगला प्रसंती देत असून अभयारण्यातील पक्षी पाहण्याकरिता पर्यटकांची गर्दी होत असते. वनविभागाच्या हद्दीमध्ये कर्नाळा हा किल्ला येत असून पक्षी अभयारण्यामुळे हा परिसर नेहमी गजबजलेला दिसत असतो. इतिहास कालीन हा कर्नाळा किल्ला आहे.

पक्षी अभयारण्यामुळे किल्याच्या पायथ्याशी वनविभागाचे गेट आहे. या पक्षी अभयारण्यामध्ये गेट जवळील पायथ्याजवळ रस्त्याची स्वछता, पर्यटकांची पार्किंग व्यवस्था ग्रामविकास परिस्थीतीकिय समिती सांभाळत आहे. ह्यामध्ये रानसई गाव पार्किंग व्यवस्था सांभाळत आहे. तर पक्षी अभयारण्यात आणि किल्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश शुल्क कल्ले गाव सांभाळत आहे. यातून मिळणारी रकमेचा उपयोग साफ सफाई, देखरेख करणाऱ्या कर्मचार्यांचे वेतन तसेच अभयारण्यात ज्या ठिकाणी अतिधोकादायक वाट असेल त्या ठिकाणी लोखंडी ग्रील लावण्यात येत असून सुरक्षित वाट तयार करण्यात येत आहे. महिन्याला सुमारे साडेतीनशे लाख रुपयांचा नफा या समितीला होत आहे. 

पक्षी अभयारण्यात मोर, पोपट, ससे, घार हे पक्षी पर्यटकांना पाहण्याकरिता उपलब्द आहेत. एका दिवसातच कर्नाळा किल्ले पाहणी आणि अभयारण्य पाहणी होत असल्यामुळे ह्या कर्नाळा किल्ला आणि आजूबाजूच्या पक्षी अभयारण्यामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.