Sun, Sep 23, 2018 13:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चिमुरडीवर अत्याचार करणार्‍याला बेड्या

चिमुरडीवर अत्याचार करणार्‍याला बेड्या

Published On: Jan 29 2018 1:31AM | Last Updated: Jan 29 2018 12:30AMडोंबिवली : प्रतिनिधी

चार वर्षाच्या चिमुकलीला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गीतेश ऊर्फ पिंट्या बबन बनसोडे या 36 वर्षीय लिंगपिसाटाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास ही चिमुरडी घराबाहेर खेळत होती. त्याच सुमारास नराधम गीतेशने तिला खाऊचे आमिष दाखवून स्वतःच्या घरात नेले आणि तेथे विवस्त्र करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. चिमुरडीने या नराधमाच्या तावडीतून कशीबशी सुटका करत घर गाठले. त्यावेळी तिचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले होते. मात्र झालेल्या अत्याचारामुळे त्रास होत असल्याने रात्रीच्या सुमारास पीडित चिमुरडीची आईने चौकशी केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आईने तात्काळ चिमुरडीला घेऊन तडक पोलीस ठाणे गाठले. भयभीत मुलीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांपुढे कथन केला. पोलिसांनी गीतेशविरोधात भादवि कलम 376, (2), (आय) व पोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत कल्याण परिसरात संताप व्यक्‍त केला जात आहे. या नराधमाला पोलिसांनी कठोरात कठोर कलमे लावावीत अशी मागणी करण्यात येत आहे.   

रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात त्याला हजर केले असता 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. ढिकले करत आहेत.