Sun, Jul 21, 2019 10:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाचवर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम अटकेत

पाचवर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम अटकेत

Published On: Mar 19 2018 1:47AM | Last Updated: Mar 19 2018 1:06AMठाणे : प्रतिनिधी

भांडुप येथे राहणार्‍या पाचवर्षीय चिमुरडीला आईस्क्रीमचे आमिष दाखवून व तिचे अपहरण करून निर्जन ठिकाणी नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची संतप्त घटना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिवाजीनगर येथे शुक्रवारी दुपारी घडली होती. याप्रकरणी अज्ञात नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी चार टीम बनवून आरोपीचा कसून शोध सुरु केला होता. अखेर पोलिसांनी 24 तासाच्या आत नराधमास बेड्या ठोकत गजाआड केले. सुमन नंदकुमार झा असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे.

भांडुप येथील सोनापूर येथे राहणारी पाच वर्षीय चिमुकली शुक्रवारी दुपारी अंगणात खेळत होती. यावेळी एका अज्ञाताने आईस्क्रीमचे आमिष दाखवून तिचे अपहरण करून ठाण्यात आणले. यानंतर नराधमाने चिमुकलीस दुपारी 2.45 च्या सुमारास आझादनगर येथील शिवाजीनगरजवळ असलेल्या खन्ना कंपाऊंड येथील झुडपात निर्जनस्थळी नेले व तेथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर नराधम पीडित मुलीस तेथेच सोडून पळून गेला. मुलगी रडत रडत रस्त्यावर फिरत असताना एका नागरिकास आढळून आली. त्या नागरिकाने मुलीस कापूरबावडी पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी

चिमुकलीस सीव्हील रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मुलीने दिलेल्या माहितीनुसार या घटनेतील नराधमाचा कसून शोध सुरु केला. तपासासाठी चार टीम बनवण्यात आल्या होत्या. अखेर पोलिसांनी सुमन नंदकुमार झा या आरोपीस 24 तासाच्या आत अटक करून त्यास बेड्या ठोकल्या.