Fri, Apr 19, 2019 12:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वसईत उद्या धडाडणार राज ठाकरेंची तोफ

वसईत उद्या धडाडणार राज ठाकरेंची तोफ

Published On: Apr 30 2018 1:44AM | Last Updated: Apr 30 2018 1:30AMनालासोपारा : वार्ताहर

वसई पश्चिमेतील नरवीर चिमाजी अप्पा मैदानावर 1 मे रोजी (उद्या) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. वसई-विरारसह जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांवर ते काय बोलतात याकडे वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्याची सुरुवात वसईतून होणार आहे. राज ठाकरेंनी वसईत सभा घ्यावी, अशी मनसैनिकांची गेल्या अनेक वर्षांपासून इच्छा होती. ती इच्छा महाराष्ट्र दिनी पूर्ण होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

वसईच्या राजिवलीमधील सरकारी जमिनी परप्रांतीयांनी गिळंकृत केल्या. ही बाब वसईत मनसेचे तालुका अध्यक्ष जयेंद्र पाटील, कुंदन संख्ये, विजय मांडवकर यांनी राज यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी याबाबत पाठपुरावा करून महसूल, पालिका आणि वन विभागाला कारवाई करण्यास भाग पाडले. येथे फसवणूक झालेल्या नागरिकांना बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आवाहन वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी केले आहे. राज ठाकरे यांनी घेतलेला मुद्दा तडीस लावण्यास सुरवात केल्याने त्यांच्याकडून सर्वसामन्य लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. वसई, विरार आणि पालघर जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी कंबर कसली आहे.