Wed, Sep 26, 2018 12:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ पाहून बिल गेट्स भारावले

‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ पाहून बिल गेट्स भारावले

Published On: Dec 21 2017 2:10AM | Last Updated: Dec 21 2017 1:43AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अर्थात मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ हा बॉलीवूडचा चित्रपट पाहून चांगलेच भारावले. 2017 च्या आठवणींचा कानोसा घेत असताना ट्विट्द्वारे चित्रपटावर स्तुतीसुमने उधाळली. 

2017 या वर्षातील काहीच दिवस शिल्लक असताना वर्षातील आठवणींचा मागोवा घेताना बिल गेट्स यांनी अक्षय कुमार आणि भूमि पेडणेकर यांच्या भूमिका असलेला टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटाचे विशेष कौतुक केले. 2017 हे वर्ष खडतर होते, यात शंका नाही. पण या वर्षानेही काही आशा आणि प्रगतीचे अद्भुत क्षण दिले, असे सांगत बिल गेट्स यांनी 2017 चे विश्लेषण करताना, अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट एक प्रेम कथा’चा उल्लेख करत, या सिनेमाचे कौतुक केले.

समाज प्रबोधन आणि स्वच्छतेचा संदेश देणारा सिनेमा म्हणून यावर्षी अक्षय कुमारचा ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ चांगलाच गाजला. यापूर्वी या सिनेमाचे कौतुक स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. या सिनेमाने 216 कोटी रुपयांची कमाई केली.