Sun, May 26, 2019 11:41



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एसटी कामगारांच्या वेतनवाढीचा आज फैसला? अहवाल गुलदस्त्यातच

एसटी कामगारांच्या वेतनवाढीचा आज फैसला? अहवाल गुलदस्त्यातच

Published On: Jan 15 2018 1:39AM | Last Updated: Jan 15 2018 1:29AM

बुकमार्क करा




मुंबई : प्रतिनिधी

 एसटी प्रवाशांना वेठीस धरून ऐन दिवाळी सणामध्ये विविध मागण्यासाठी संप पुकारणार्‍या एसटी कर्मचार्‍याच्या तोंडाला राज्य सरकारने पानेच पुसली आहेत. उच्च न्यायालयाने एसटी कामागारांचा संप बेकायदा ठरवला, त्यांच्या वेतनवाढीसंदर्भात स्थापन केलेल्या उच्चस्थरीय कमिटीला 21 डिसेंबर पर्यंत निर्णय घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र हा अहवाल गुलदस्त्यात आहे.

उद्या याचिकेवर सुनावणी होणार असल्याने कामगारांच्या वेतनवाढीचा फैसला होण्याची शक्यता आहे. केवळ एसटीवर अवलंबून असलेल्या सर्वसामान्य जनतेला वेठीस धरून ऐन दिवाळी सणामध्ये संप पुकारणार्‍या एसटी कामगारांच्या संपाविरोधात ज्येष्ठ पत्रकार जयंत साटम यांच्यावतीने अ‍ॅड. पूजा थारोत आणि अ‍ॅड. विनय राठी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या संपाकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. 

या याचिकेची न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी गंभीर दखल घेत, संप बेकायदा ठरवताना कामगारांच्या वेतन वाढीचा मुद्दाही महत्त्वाचा ठरवला. कामगारांच्या वेतन वाढीसाठी राज्य सरकारला कमिटी स्थापनकरण्यास भाग पाडून या कमिटीला कामगारांच्या वेतन वाढीसंदर्भात 15 डिसेंबरपर्यंत अंतरिम निर्णय आणि 21 डिसेंबर पर्यंत अंतिम निर्णय घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र या कमिटीने काय निर्णय घेतला आणि अहवाल काय सादर केला आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. 

या याचिकेवर उद्या न्यायमूतीर्र् आर.एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र या कमिटीने वेतनवाढीसंदर्भात निर्णय घेऊन काय अहवाल सादर केला तो अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भात कोणता निर्णय होतो,याकडे सर्व एसटी कामगारांचे लक्ष लागून आहे.