Sat, Jul 20, 2019 23:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आजच्या एल्गार मोर्चाला पोलीस परवानगी नाकारली

एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

कोरेगाव-भीमाप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भायखळा येथील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान या मार्गावर भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड .प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार्‍या एल्गार मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र राज्य सरकारने पोलिसांच्या माध्यमातून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला असला तरी मोर्चा होणारच असा निर्धार आंबेडकर यांनी व्यक्त केला. 

मिलिंद एकबोटे यांच्यानंतर संभाजी भिडे गुरुजींना अटक करण्यात येईल अशी अपेक्षा होती मात्र सरकारने त्यांना पाठीशी घातले आहे.   भिडे गुरुजींना अटक केली असती तर मोर्चा काढण्याची गरज भासली नसती. लोकशाहीमध्ये मोर्चा काढणे, आंदोलन करणे हा जनतेचा हक्क आहे, सरकार मोर्चाला मिळणार्‍या संभाव्य प्रतिसादाबाबत घाबरले असून मोर्चा रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. मोर्चामध्ये काही घडले तर त्याची जबाबदारी सरकारची असेल असेही त्यांनी जाहीर केले.

सरकारला माझ्याकडून राजकीय भीती बाळगण्याची गरज नाही. मला कोणतेही मंत्रीपद नको, यापूर्वी देखील मला मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती मात्र मी ती नाकारली होती, असे आंबेडकर म्हणाले.

भिडे गुरुजींंच्या अटकेसाठी सोमवारी निघणार्‍या या मोर्चात किती  लोक असतील, याचा अंदाज मुंबई पोलिसांना नाही. मात्र  कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून योग्य तो पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते आणि पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी पुढारीला  सांगितले.

Tags : Elgar Morcha, refused, police permission, Today, mumbai news


  •