Mon, Apr 22, 2019 05:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सहा नगरपंचायतींसाठी आज मतदान

सहा नगरपंचायतींसाठी आज मतदान

Published On: Apr 06 2018 2:13AM | Last Updated: Apr 06 2018 1:06AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

कणकवली (सिंधुदुर्ग) व आजरा (कोल्हापूर) नगरपंचायत तसेच जामनेर (जळगाव) व वैजापूर (औरंगाबाद) या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी  6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणच्या निवडणुकीची मतमोजणी 12 एप्रिल रोजी होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 5 मार्च 2018 रोजी 6 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, देवरूख तर कणकवली (सिंधुदुर्ग), आजरा ( कोल्हापूर), जामनेर (जळगाव) व वैजापूर (औरंगाबाद) या नगरपरिषदा- नगरपंचायतींसाठी 6 एप्रिल रोजी मतदान व 7 एप्रिल रोजी मतमोजणी होणार होती. परंतु न्यायालयीन निकालाच्या अनुषंगाने या कार्यक्रमात बदल करावा लागला. त्यानुसार गुहागर व देवरूख नगरपंचायतींसाठी 11 एप्रिल रोजी मतदान होईल.

त्याचबरोबर कणकवली नगरपंचायतीतील प्रभाग क्र.10मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी तसेच जामनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.7 मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी 11 एप्रिल रोजी मतदान होईल. उर्वरीत ठिकाणी 6 एप्रिल रोजी मतदान होईल या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी 12 एप्रिल रोजी होईल. रत्नागिरी, आळंदी, तासगाव, दुधनी, सावदा, कुंडलवाडी व कळंब या नगरपरिषदा - नगरपंचायतींतील प्रत्येकी एका रिक्त पदासाठीदेखील 6 एप्रिल रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

tags : mumbai, mumbai news, Today, poll, six Nagar Panchayat,