Tue, Sep 25, 2018 07:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आज खानदेशात कानुबाई उत्सव उत्साहात 

आज खानदेशात कानुबाई उत्सव उत्साहात 

Published On: Aug 19 2018 5:08PM | Last Updated: Aug 19 2018 5:08PMनवी मुंबई : प्रतिनिधी

खानदेशात आज कानुबाई उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज कानुबाईचे घराघरात आगमन झाले. नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले खान्देशवासी आज कानुबाई सणानिमित्त आपल्या गावी दाखल झाले. विशेष म्हणजे या उत्सवात खुद्द केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे यांनी ही उपस्थित राहिले.  

केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी कानुबाईला डोक्यावर घेत देवीची पुजा केली. खानदेशातली जळगाव, धुळे, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, एरोंडोल, भुसावळ, पारोळा आणि जामनेर मध्ये आज आणि उद्या हा उत्सव साजरा केला जातो. रात्र जागून कानुबाईचे जागरण केले जाते. दुस-या दिवशी दुपारनंतर विसर्जन केले जाते. याला रोट असं ही म्हणतात. तर देवीला आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.