Thu, Nov 22, 2018 16:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई विद्यापीठ स्टुडंट कौन्सिलची आज निवडणूक 

मुंबई विद्यापीठ स्टुडंट कौन्सिलची आज निवडणूक 

Published On: Feb 26 2018 1:16AM | Last Updated: Feb 26 2018 12:56AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाच्या स्टुंडट कौन्सिलची निवडणूक सोमवारी होणार असून याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या अध्यक्ष पदाच्या निवडीवर आपले वर्चस्व राहावे यासाठी युवा सेना आणि अभाविप या दोन्ही संघटनांनी सर्वस्व पणाला लावले आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच दुसरीकडे विद्यापीठाच्या स्टुंडट कौन्सिल निवडणुकीत युवा सेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परीषद पुरस्कृत उमेदवार आमने सामने आले आहेत. शुक्रवारी या निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी अध्यक्ष आणि सचिव पदासाठी आलेल्या अर्जांपैकी प्रत्येकी एका जणाने अर्ज मागे घेण्यात आल्याची माहिती विद्यार्थी विकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता सचिव पदाची निवडणुक बिनविरोध होणार असून अध्यक्ष पदावर कोणत्या विद्यार्थी संघटनाच्या उमेदवाराची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अध्यक्ष पदासाठी अभाविप आणि युवा सेना आमने सामने आली आहे. अध्यक्ष पदासाठी सूरज यादव आणि संजय नागाठणे यांच्यात लढत होत आहे.

विद्यार्थी विकास मंडळातर्फे काही दिवसांपूर्वीच स्टुंडट कौन्सिलच्या निवडणुकीची घोषणा केली होती.