Wed, Mar 20, 2019 23:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा मोर्चेकरांवरील गुन्हे मागे घेणार : निलंगेकर

मराठा मोर्चेकरांवरील गुन्हे मागे घेणार : निलंगेकर

Published On: Feb 10 2018 1:10PM | Last Updated: Feb 10 2018 1:13PMमुंबई : प्रतिनिधी

मराठा समाज कुणापुढे कधी हात पसरत नाही, स्वतःच्या ताकदीवर पुढे जातो आणि आपले प्रश्न सोडवतो हे आपण सर्वांनी दाखवून दिले आहे. मराठा मोर्चाच्या निमित्ताने जे प्रश्न पुढे आले ते सोडविण्याचे काम सरकारी पातळीवर सुरू आहे. या मोर्चाच्या निमित्ताने राज्यात ज्या-ज्या ठिकाणी मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असतील ते सर्व मागे घेण्यात येतील असे आश्वासन कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिले.

अखिल मराठा फेडरेशन आणि मराठा बिझनेस फोरमने आयोजित केलेल्या मराठा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटन कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत पवार, उपाध्यक्ष इंद्रजित सावंत, शिवसेना प्रतोद आ. अनिल परब, माजी आमदार बाळ माने, अरुण पवार, दिलीपदादा जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

मराठा समाज्याच्या व्यक्ती सर्व ठिकाणी आहेत, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमठवला आहे, तरी या समाजातील तरुण, युवा पिढी मागे का? याचा विचार करून आपण सर्वांना घेऊन पुढे गेले पाहिजे. प्रत्येक मराठा उद्योजकाने, नेत्याने आपल्या समाजातील एका तरुणांस स्वतःच्या पायावर उभे करावे. आम्ही तुमच्यावर अवलंबून नाही तर तुम्ही आमच्यावर अवलंबून आहात हे आपल्या एक जुटीतून आपल्यावर अन्याय करणाऱ्यांना दाखवून द्या, असे आवाहन निलंगेकर पाटील यांनी केले.