होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षणासाठी पंकजांना एक तास मुख्यमंत्री करा : सेना

मराठा आरक्षणासाठी पंकजांना एक तास मुख्यमंत्री करा : सेना

Published On: Jul 29 2018 1:40AM | Last Updated: Jul 29 2018 1:36AMमुंबई : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाचा निर्णय पंकजा मुंडे घेऊ शकतात व असे निर्णय घेण्यात कोणतेही अडथळे नसतील, तर पंकजा यांना एक तासासाठी का होईना, सर्वानुमते मुख्यमंत्रिपद बहाल करून तेवढी आरक्षणाची फाईल मोकळी करा, असा टोला शिवसेनेने राज्य सरकारला लगावला आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून चालढकल केली जात असून, मुख्यमंत्री फडणवीस या प्रश्‍नी एकाकी पडले आहेत, असा प्रश्‍न शिवसेनेच्या मुखपत्रातून उपस्थित करण्यात आला आहे. पंकजा मुंडे जे बोलत आहेत त्यात राजकारण आहे असे कुणाला वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. मराठा समाजास आरक्षण मिळावे, यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाईन, असे त्यांनी सांगितले आहे. मग त्यांच्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीत जाऊन, पंतप्रधानांना भेटून मराठा आरक्षणाचा तिढा का सोडवीत नाहीत, असा प्रश्‍नही शिवेसेनेने उपस्थित केला आहे.