Tue, Apr 23, 2019 19:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टिटवाळा : भाच्याकडून मामाची हत्या 

टिटवाळा : भाच्याकडून मामाची हत्या 

Published On: Aug 24 2018 4:55PM | Last Updated: Aug 24 2018 4:55PMटिटवाळा : प्रतिनिधी 

टिटवाळा पोलिस स्टेशनच्या हद्द्दीतील उतणे गावाच्या खरमठवाडी या आदिवासी पाड्यात भाच्याकडूनच मामाची हत्या झाल्याची घटना घडली आहे.

कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातील टिटवाळा नजीकच्या उतणे गावातील खरमठवाडी या आदीवासी पाड्यात राहणाऱ्या हरिचंद्र जाधव (वय ३५) याने फावड्याच्या दांडक्याने प्रहार करत आपला मामा असलेल्या गोविंद फसाळे यांची हत्या केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मयत गोविंद फसाळे( वय ४८) याला आपली पत्नी गुलाब ( वय ३२) हीचे आणि आपला भाचा हरिश याचे अनैतिक संबध असल्याचा संशय होता. यातून घरात सतत भांडणे होत होती. काल रात्री देखील याच कारणावरुन मामा- भाच्यात वाद झाला हा वाद विकोपाला जात या दोघांत हाणामारी झाली. यातच हरिश याने बाजुला पडलेल्या फावड्याच्या लाकडी दांडक्याने आपला मामा गोविंद याच्या डोक्यात प्रहार केला घाव वर्मी बसल्याने यात मामाचा जागीच मृत्यू झाला . सदर घटनेचे वृत्त गावचे पोलिस पाटील यांनी टिटवाळा पोलिस स्थानकाला कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाउन पंचनामा करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून याबाबतचा अधिक तपास चालू आहे.