Thu, Jul 18, 2019 13:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विवाहितेची अडीच वर्षाच्या चिमुकलीसह आत्महत्या

विवाहितेची अडीच वर्षाच्या चिमुकलीसह आत्महत्या

Published On: Jun 03 2018 1:35AM | Last Updated: Jun 02 2018 4:56PMटिटवाळा : प्रतिनिधी

टिटवाळा येथील मांडा पश्चिमेला जानकी विद्यालया शेजारी असलेल्या मनोरमा चाळीत राहणाऱ्या एका  महिलेने  आपल्या स्वत:च्या अडीच वर्षाच्या चिमुकलीसह  आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे . या घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

शोभा कोकणे (वय २५) ही महिला आपला पती किसन आणि आपली अडीच वर्षाची  मुलगी आकांक्षा यांच्यासह येथील जानकी विद्यालय शाळेच्या परिसरांतील मनोरमा चाळीत राहत होती. दिनांक १ जून रोजी सकाळी पती कामावर गेल्यानंतर घराचा दरवाजा लावुन आपल्या मुलीसोबत घरात होती. संध्याकाळी चाळीत असलेल्या नळाला पाणी आल्याने पाणी भरायला बोलावण्यासाठी शेजारची महिला गेले असता बराचवेळ दार उघडले न गेल्याने शेजारील महिलेला संशय आल्‍याने तीने  चाळीतील शेजार्‍यांच्या मदतीने पोलिस स्टेशनला कळवले. घटनास्थळी पोलिस आल्यानंतर त्‍यांनी दरवाजा उघडला असता, सदर महिला ही घराच्या छताला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढुन आली. तर  हॉलमध्ये असलेल्या बेडवर अडिच वर्षांची तिची मुलगी आकांक्षा ही निष्प्राण अवस्थेत पडलेली आढळूनन आली . सदर महिलेने आत्महत्येपुर्वी मुलीला गळा दाबुन मारले असल्याचा संशय व्यक्त केला जात असुन, शोभा हीने  आत्महत्येपुर्वी एक चिठ्ठी लिहिली होती या चिठ्ठीत आपण आपल्या मुलीला सोबत घेऊन जात आहोत असे तिने लिहिले होते. सदर घटनेला शोभाचा नवराच जबाबदार असून तो शोभाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा या त्रासाला कंटाळूनच तिने आत्महत्या केली असल्याची माहिती शोभाचे वडीलांनी टिटवाळा पोलिसांना दिली आहे. तिचा पती किसन कोकणे याच्याविरूध्द तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चौकशी अंतर्गत किसन विरोधात पत्नी शोभाला आत्महत्येस   प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असुन, या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे या परिसरात शोककळा पसरली आहे .