Fri, Jan 18, 2019 09:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एक्स्प्रेसचे इंजिन फेल, लोकलचे वेळापत्रक कोलमडले

एक्स्प्रेसचे इंजिन फेल, लोकलचे वेळापत्रक कोलमडले

Published On: Feb 23 2018 4:58PM | Last Updated: Feb 23 2018 3:13PMठाणे : प्रतिनिधी

मध्यरेल्वे मार्गावर एक्सप्रेसचे इंजिन फेल झाल्याने लोकलचे वेळापत्रक कोलमडले. आटगांव - तानसिट दरम्यान डाऊन मार्गावर पोल नं.९९/१९ जवळ दुपारी १.३५ मिनिटांनी सुविधा एक्सप्रेसचे इंजिन फेल झाले.

रेल्वे इंजिन फेल झाल्यामुळे खडावली येथून जोड इंजिन मागविण्यात आले आहे. लोकलची वाहतुक विस्कळीत असून ११.४६ ची सिएसएमटी ते कसारा लोकल आटगांव स्थानकात रद्द करण्यात आली. या मार्गावर आठ दिवसातील ही तिसरी घटना आहे. असे प्रकार वारंवार होत असल्यामुळे प्रवाशांना स्थानकावर होणाऱ्या गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे.