होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अवयवदानामुळे वाचले तिघांचे प्राण

अवयवदानामुळे वाचले तिघांचे प्राण

Published On: Apr 10 2018 1:37AM | Last Updated: Apr 10 2018 12:51AMमुंबई : प्रतिनिधी

अंधेरीच्या कोकिळाबेन रुग्णालयात उपचार घेणार्‍या रत्नागिरी जिल्ह्यातील 45 वर्षीय महिलेला डॉक्टरांनी ब्रेनेडेड घोषित करून नातेवाईकांना अवयवदानाविषयी कल्पना दिली. आपल्या मृत पत्नीचे अवयवदान केल्यानंतर तीन रुग्णांचा प्राण वाचणार असल्याने तिच्या पतीने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. या महिलेचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले.

रत्नागिरीच्या 45 वर्षीय राधा डोंगरे (बदललेले नाव) यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यांच्यावर औषधोपचारही सुरू होते. राधा यांना अचानक तीव्र डोकेदुखी जाणवू लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांना अंधेरी येथील कोकिळाबेन रुग्णालयात दाखल केले. येथे राधा यांच्यावर उपचार सुरू होते; पण मेंदूत रक्‍तस्राव झाल्याने त्यांना डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले. त्यानंतर डॉक्टरांनी नातेवाईकांकडे अवयवदानाची परवानगी मागितली. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांचे अवयव गरजूला  जीवनदान ठरू शकतात, या विचाराने तातडीने राधा यांच्या पतीने होकार दिला. 

अवयवदानाची परवानगी मिळताच डॉक्टरांनी विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीला (झेडटीसीसी)  माहिती दिली. त्यानुसार राधा यांचे यकृत आणि मूत्रपिंड दान करण्यात आले. यामुळे तिघांचे प्राण वाचले आहेत. 

Tags : Mumbai, Mumbai news, Three organisms, survived, organ donation,