Fri, Nov 16, 2018 15:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भांडुपमध्ये गँगवॉर भडकणार

भांडुपमध्ये गँगवॉर भडकणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : अवधूत खराडे

गेल्या आठवड्यात घडलेली तीन हत्याकांडे आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमुळे भांडुपमधील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. भांडूप पोलीस याला जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. येत्या काळात गँगवार भडकणार असल्याने काही गँगस्टर्स भूमिगत झाले आहेत. गुन्हे शाखेच्या एका पथकाने एका बड्या गँगस्टरला हत्यार सापडल्याच्या गुन्ह्यात अटक करुन काही महिने जेलबंद राहण्याची ऑफरही दिली आहे.

कुमार पिल्लई टोळीसाठी काम करत असलेल्या संतोष चव्हाण उर्फ काण्या संत्याचा अमित भोगले याने काटा काढला. गँगस्टर अनिल पांडे याचीही हत्या करण्यात आली. आता भोगले आणि गँगस्टर मयुर शिंदे यांचेच वर्चस्व भांडूपमध्ये आहे. काण्या संत्याच्या हत्येप्रकरणी भोगलेसह त्याच्या साथिदारावर भांडूप वेळेत आरोपपत्र दाखल न केल्याने ते जामिनावर आहेत.

काण्या संत्याच्या हत्येवेळी सोबत असलेले विजय बाबर उर्फ विज्या, आदित्य क्षिरसागर उर्फ शिर्‍या, मिलिंद कांदे उर्फ कांद्या, स्वप्नील पालांडे उर्फ सोन्या हे वेगळे झाल्याने भोगलेसोबत फक्त राकेश राऊत आणि नवीन पोरं आहेत. मयुर शिंदेची सिद्धेश तावडे उर्फ ताऊ आणि सागर जाधव यांनी साथ सोडली आहे. शिंदे याच्यावर एक आमदार आणि भाजपच्या राज्यमंत्र्याचा हात असला तरी त्याचा नातेवाईक राहूल माधव उर्फ मुन्ना, आशीष घोडगे उर्फ आशा आणि ठाण्यातील काही पोरं त्याच्यासोबत उरली आहेत.

भोगलेपासून वेगळा झालेला विज्या स्वतंत्रपणे कारवाया करतो. सोन्या पालांडे याने भांडूप सोडले आहे. त्याच्या भावाने नुकतीच पश्‍चिम उपनगरात एकाची हत्या केली होती. काण्या संत्या टोळीचा हड्डी आणि निशांत मांजरेकर यांची परिसरात दहशत आहे. तर अजय गुरव हा बड्या कंपनीसाठी अंबरनाथमध्ये केलेल्या गोळीबाराच्या गुन्ह्यात गजाआड आहे. तसेच पांडेचा साथिदार गुज्जी हा शिवडीतील गोळीबाराप्रकरणी जेलबंद असून सुभाष भांडे जामिनावर सुटून भांडूपमध्ये परतला आहे.

काण्या संत्या आणि पांडेच्या हत्येनंतर दोघांच्याही साथिदारांनी भोगले, तसेच शिंदेची हत्या करण्याचे प्रयत्न केले. आता या दोघांपासून वेगळे झालेले काही जण एकत्र आहेत. काहीजण एकमेकांच्या संपर्कात स्वतंत्रपणे गुन्हेगारी कारवाया करत आहेत. बांधकामाधीन इमारतीना सुरक्षा देणे, खडी, रेती, सिमेंट, कामगार पुरविणे, तसेच परिसरात चालणारी अनधिकृत बांधकामे, जुगाराचे अड्डे, क्‍लब चालविणार्‍यांकडून हप्ते, खंडण्या गोळा करण्याचे काम हे सक्रीय गुन्हेगार करत आहेत.

Tags : mumbai news, Three murderer, deadly attack, crime increase, Bhandup 


  •