Tue, Nov 20, 2018 23:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल आगीप्रकरणी आणखी तिघे अटकेत

कमला मिल आगीप्रकरणी आणखी तिघे अटकेत

Published On: Jan 20 2018 11:11PM | Last Updated: Jan 20 2018 11:11PMमुंबई : प्रतिनिधी

कमला मिल आगीप्रकरणी दाखल गुह्यामधे ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी आणखी तिघांना ताब्‍यात घेतले आहे. यामध्ये कमला मिलचा संचालक आणि भागीदार रवी भंडारी याच्यासह मोजोस बिस्त्रो आणि वन अबव्ह या रेस्टोपबला हुक्का पुरविणाऱ्या कंपनीचा मालक उत्कर्ष पांडे आणि अग्निशमन दलाचा अधिकारी राजेंद्र पाटील यांचा समावेश आहे. 

शनिवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. तिन्ही आरोपींचा गुह्यातील सहभाग उघड़ झालाल्‍याचे पोलिसांनी सांगितले. तिन्ही आरोपींना रविवारी सुट्टी कालीन न्यायालयात हजर केले जाणार आहे.