मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर बस अपघातात तीन ठार

Last Updated: Oct 21 2019 7:33PM
Responsive image

Responsive image

कामशेत : प्रतिनिधी       

मतदानासाठी मुंबई वरून गावी (वाझोळी ,ता.पाटण, सातारा ) चाललेल्या पाटील कुटुंबियांच्या बसचा बौर गावच्या हद्दीतील मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी (दि.२१) पहाटेच्या सुमारास आपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आठ जखमी झाले. या अपघाताची नोंद कामशेत पोलिस ठाण्यात झाली. 

या संदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बौर गावच्या हद्दीतील मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई कडून साताऱ्यास जाणारी बस द्रुतगती मार्गावर टायर फुटल्याने उभ्या असणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात बस मधील सयाजी पांडुरंग पाटील (वय ६५), संभाजी शिवाजी पाटील (वय ४५  दोघे रा.वाझोली, ता. पाटण , सातारा ) व मोहनकुमार शेट्टी (वय४२, रा. वांगणी, बदलापूर ,ठाणे ) हे तिघे जागीच मयत झाले.

बाबासो पांडुरंग पाटील (वय ५१), सुवर्णा बाबासो पाटील (वय ४५), गणेश अरुण पाटील (वय २५), सुरज आनंदराव पाटील (वय २७), शैलेश कुमार पाटील (वय ३३), अनिल मधुकर पाटील (वय ३७), जयशिंग खाशाबा पाटील, विश्वनाथ तुकाराम पाटील (वय ४५), आकाश जयाईनग पाटील (वय २५), भिवाजी चंदू पाटील (वय ५५ ), विशाल किसन पाटील (वय २७), तुकारास सावळाराम भिंगरदीवे (वय ४४), राणी मंगेश देसाई (वय २४, सर्व राहणार वाझोळी ,ता. पाटण, जि. सातारा ) यातील आठजण जखमी झाले असून त्यांच्यावर सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत . 

या अपघातातील पुढील तपास पोलिस हवालदार अजय दरेकर हे करत आहेत .