Thu, Jun 27, 2019 13:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात एकाच दिवशी तीन आगीच्या घटना

ठाण्यात एकाच दिवशी तीन आगीच्या घटना

Published On: Feb 12 2018 2:13AM | Last Updated: Feb 12 2018 1:41AMठाणे : प्रतिनिधी

रविवारी एकाच दिवशी तीन ठिकाणी आग लागल्याच्या घटना समोर आल्या. त्यात मुंब्रा येथील एका घराला, एका इंडिका कारला, तर मुंब्रा -पनवेल रस्त्यावरील एका भंगार गोडाऊनला आगीचा त्यात समावेश आहे. दरम्यान, इतर घटनांत कुणीही जखमी झाले नसले, तरी मुंब्रा येथे घराच्या आगीत 50 वर्षीय घरमालक 16 टक्के भाजला आहे. त्यांना कळव्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीची पहिली घटना रविवारी कौसा मुंब्रा भागात सकाळी घडली. कौसा, चरणीपाडा येथील आशीर्वाद बिल्डींग रूम नं. 201 मध्ये राहणारे नमरुद्दीन खान (50) यांच्या घरात अचानक आग लागली. यात काही सामान जळून खाक झाले तर नमरुद्दीन खान हेही 16 टक्के भाजले. त्यांना त्वरित ठाणे सीव्हील रुग्णालयात व नंतर कळवा येथील शिवाजी रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी इमारतीतल्या 31 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. पालिका आपत्ती व्यवस्थापन पथक व अग्निशमनच्या जवानांनी 2 फायर इंजिन, 2 क्यूआरव्ही व एक पाण्याच्या टँकरसह धाव घेऊन आग नियंत्रणात आणली.मच्छर अगरबत्तीमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

रविवारी दुपारी मुंब्रा पनवेल रस्त्यावरील शीळफाटा येथील हॉटेल भोलेनाथजवळील एका भंगार गोडाऊनला आग लागल्याची घटना समोर आली. यात गोडाऊन मधील सामान जळल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपत्ती व्यवस्थापन पथकाने फायर इंजिन व पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले.