Sat, Nov 17, 2018 20:32होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : एकाच वेळी भीषण आगीच्या तीन घटना

मुंबई : एकाच वेळी भीषण आगीच्या तीन घटना (व्हिडिओ)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नवी मुंबई : प्रतिनिधी

तळोजा परिसरातील धान्या गोदामाला आज, दुपारी भीषण आग लागली आहे. आगीची भीषणता इतकी आहे. की काही किलोमीटरवरही या आगीचा काळा धूर दिसत आहे. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचे प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी अग्निशमनच्या पाच गाड्या दाखल झाल्या असून, टँकरही बोलविण्यात आले आहेत. 

दरम्यान, याचवेळी पनवेलमध्ये जुन्या टायरच्या गोदामाला आग लागली असून, मुंबईत मानखूर्दमध्ये भंगाराचे साहित्य ठेवलेल्या गोदामालाही आग लागली आहे. काही किलोमीटरच्या अंतरांवर तीन भीषण आगी लागल्यामुळे अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.