Wed, Jul 24, 2019 12:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन कोटींचे ड्रग्ज जप्त

आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीन कोटींचे ड्रग्ज जप्त

Published On: Aug 28 2018 1:45AM | Last Updated: Aug 28 2018 1:13AMमुंबई : प्रतिनिधी

जोहन्सबर्ग येथून चोरट्या मार्गाने आणलेले  तीन कोटी रुपयांचे एम्फेटामाईन ड्रग्ज छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी जप्त केले. याप्रकरणी चेचे लुलू हुबर्ट या टांझानियाच्या महिलेला एआययू अधिकार्‍यांनी अटक करून एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई केली.

विदेशातून मोठ्या प्रमाणात गोल्ड बार आणि ड्रग्जची तस्करी होत असल्याने हवाई गुप्तचर विभागाने विमानतळावर प्रत्येक व्यक्तीच्या सामानाची तपासणी सुरू केली होती. सोमवारी आदिसअबाबामार्गे जोन्हसबर्गहून इथोपियन एअरवेजवरून चेचे हुबर्ट विमानतळावर आली. हालचाल संशयास्पद वाटताच अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चेचे हिने बॅगेच्या खाली असलेल्या ट्रॉलीमधून 3007 ग्रॅम वजनाचे एम्फेटामाईन ड्रग्ज आणल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे तीन कोटी रुपये आहे. पुढील तपास एआययूचे अधिकारी करीत आहेत.