होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टिटवाळ्यात मयताच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यातून धमकीचे पत्र

टिटवाळ्यात मयताच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यातून धमकीचे पत्र

Published On: Apr 28 2018 2:00AM | Last Updated: Apr 28 2018 1:15AMमुंबई :

टिटवाळा येथील पोलीस जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या मितेश जगताप यांच्या कुटुंबांला टिटवाळा पोलीस स्टेशनमधून आणखीन एक निनावी नावाने धमकीचे पत्र  आल्याने जगताप कुटुंबिय भयभीत झाले आहे.  ते मोठ्या दहशतीखाली वावरत आहेत. यामुळे सरकारकडे याप्रकरणाकडे लक्ष घालून न्याय द्यावा, अशी  मागणी त्यांनी  केली आहे. अन्यथा मंत्रालयात आत्मदहन केले जाईल, असा इशारा त्यांचे वडिल राजेश जगताप यांनी दै.पुढारीशी बोलताना दिला. 

 तुम्ही लढवत असलेली केस मागे घ्या, अन्यथा तुमचे संपुर्ण कुटुंब संपविले जाईल, यामुळे तुम्हाला कोर्टाची पुढची तारीखही पाहता येणार नाही, या आलेल्या धमकी पत्रामध्ये कुणाचेही नाव आणि पत्ता यांचा उल्लेख नाही. असा प्रकारे एका कागदावर हा धमकीवजा मजकूर पत्रात नमूद केलेला आहे. तसेच जर तक्रार मागे घेतली नाही, तर तुमचा जीव पण घेऊ शकतो. व  त्यांनी कोर्टाला कसे मॅनेज केले ह्याचा हि उल्लेख ह्या पत्रात क रण्यात आला आहे.  

मितेश जगताप ह्यांनी 23 ऑगस्ट 2017 ला पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. व सदरहू पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा भरपूर प्रयत्न केला.  पण शेवटी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर टिटवाळा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी गणपत सुळे आणि हवलदार अनिल राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळेच जगताप कुटुंबियांना धमकीचे सत्र चालू आहे. ही गार्भीयांची बाब असून असाच हा प्रकार जर चालू राहीला तर आम्हा कुटुंबांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची खंत मयत मितेशच्या आईने व्यक्त केली.