Tue, Jul 23, 2019 04:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा आरक्षणासाठी रामदास आठवलेनी सुचवला हा उपाय

मराठा आरक्षणासाठी आठवलेंनी सुचवला 'हा' उपाय

Published On: Jul 25 2018 8:31PM | Last Updated: Jul 25 2018 8:31PMमुंबई : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केवळ राज्य सरकारने कायदा करणे पुरेसे नाही. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात ग्राह्य व्हावे यासाठी संसदेत आराक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून वाढवून ७५ टक्के करणारा कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.  

यावेळी पुढे बोलताना आठवले म्हणाले की, मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे यासाठी आपण सर्वप्रथम लोकसभेत मागणी केली होती. याचे स्मरण देत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा दिला आहे. तर, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी हिंसक भूमिका घेऊ नये, तर शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन रामदास आठवलेंनी यांनी यावेळी केले.  

देशभरातील मराठा, ब्राह्मण, लिंगायत, जाट, गुज्जर आदी सवर्ण जातीतील आर्थिक दुर्बलांना स्वतंत्र प्रवर्ग करून 25 टक्के आरक्षण देणारा कायदा संसदेने केला पाहिजे. तर आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून वाढवून ७५ टक्क्यांपर्यंत केली पाहिजे. म्हणजे अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळेल असे मत व्यक्त केले. या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत मुद्दा मांडला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आणि संसदेत मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले. तर, मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना रिपाइंतर्फे भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.