Fri, Jan 18, 2019 05:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील १३ हजार शाळांना क्रीडांगणच नाही

राज्यातील १३ हजार शाळांना क्रीडांगणच नाही

Published On: Apr 21 2018 1:34AM | Last Updated: Apr 21 2018 1:29AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारित असलेल्या तब्बल13 हजार 556 शाळांमध्ये क्रीडांगणाची सुविधा नसल्यानेे विविध प्रकारातील खेळांचा सराव करणार कुठे असा विद्यार्थ्यांपुढे प्रश्‍न आहे. बीड  आणि नाशिक जिल्ह्यातील शाळांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाची सोय असलेल्या एकूण 1 लाख 10 हजार 315 शाळांपैकी 96859 शाळांमध्ये क्रीडांगणाची सुविधा असून 13 हजार 555 शाळांना क्रीडांगणच नाही. खेळांचा सराव करण्यासाठी शिक्षकांसह विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागातील शाळा परिसरात क्रीडांगण नसल्याने शेतशिवारात जाऊन विद्यार्थी खेळांचा सराव करीत असल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिंक 1180 शाळांना क्रीडांगण नाही तर नाशिक जिल्ह्यात 1193 शाळांना क्रीडांगण नसल्याचे यू डायस अहवालातून समोर आले आहे.

Tags : Mumbai, no playground, 13 thousand schools, Mumbai news,