Thu, Jan 24, 2019 19:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अपंगांसाठी कोटा ठेवण्याचे बंधन नाही

अपंगांसाठी कोटा ठेवण्याचे बंधन नाही

Published On: Apr 12 2018 1:26AM | Last Updated: Apr 12 2018 1:02AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील न्यायालयीन नोकर भरतीत अंध आणि अपंग उमेदवारांसाठी राखीव कोटा ठेवण्याचे बंधन नाही. अपंगांना राखीव कोटा ठेवण्याचा कायदा या नोकर भरतीला लागू होत नाही, असा दावा उच्च न्यायालय प्रशासनाने केला. याची न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दखल घेेऊन, यापूर्वी या नोकर भरतीला दिलेली स्थगिती कायम ठेवताना  उच्च न्यायालय प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

उच्च न्यायालय प्रशासनाने राज्यातील न्यायालयांमधील स्टेनो, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई/हमाल या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या सुमारे 8 हजार 921 पदांसाठी 28 मार्च 2018 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली. 10 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले. परंतु, या नोकर भरतीत अपंगांसाठी कायद्याने दोन टक्के राखीव कोटा ठेवण्याचे बंधन असताना हा राखीव कोटा नसल्याने नॅशनल ब्लाईंड असोसिएशन (नॅब) आणि दोघा इच्छुक अंध उमेदवारांच्या वतीने अ‍ॅड. उदय वारुंजीकर आणि अ‍ॅड. सुमित काटे यांनी भरती प्रक्रियेलाच आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी झाली.