Tue, Mar 26, 2019 21:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मरेच्या 30 स्थानकांवर रुग्णवाहिकाच नाही

मरेच्या 30 स्थानकांवर रुग्णवाहिकाच नाही

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर एका जखमी प्रवाशाला रुग्णवाहिकेअभावी प्राणास मुकावे लागण्याच्या घटनेनंतरही रेल्वे प्रशासनास अजूनही जाग आली नाही. मध्य, हार्बर आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकांच्या हद्दीत रोज सरासरी दहाहून अधिक अपघाती मृत्यू होत असतानाही 30पेक्षा अधिक स्थानकांत रुग्णवाहिका सेवा नसल्याने प्रवाशांना रेल्वे अपघातात प्राणास मुकावे लागत आहे. 

लोकमान्य टिळक टर्मिनसवर दररोज 110 मेल, एक्स्प्रेस आणि सुमारे 50 हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करत असतात. त्यामुळे कोणत्याही क्षणाला वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासू शकते. म्हणून येथे पुन्हा 108 रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्याची मागणी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र कुमार शर्मा यांनी केली आहे. मध्य रेल्वेला एकूण 30 रुग्णवाहिका देण्यात याव्यात, अशी मागणी करणारे पत्रच सार्वजनिक आरोग्य खात्याच्या प्रधान सचिवांना लिहिले आहे.

111 स्थानकांमागे केवळ 39 रुग्णवाहिका
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2014 पासून मध्य रेल्वेच्या 18 आणि पश्‍चिम रेल्वेच्या 21 स्थानकांवर राज्य सरकारच्या वतीने 108 या रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे. तिन्ही मार्गांवर मिळून मध्य रेल्वेची एकूण 75 स्थानके आहेत. तर पश्‍चिम रेल्वेच्या हद्दीत 36 स्थानके आहेत, परंतु 111 स्थानकांमागे केवळ 39 रुग्णवाहिका उपलब्ध आहेत.