Wed, May 22, 2019 22:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...तर शहरात दहशतवादी अड्डे होतील: राज ठाकरे

...तर शहरात दहशतवादी अड्डे होतील: राज ठाकरे

Published On: May 18 2018 10:42AM | Last Updated: May 18 2018 10:42AMपनवेल : वार्ताहर

महाराष्ट्रात दररोज 48 रेल्वे भरून परप्रांतीय येत असतात आणि रिकाम्या जातात. सध्या पनवेल टर्मिनल्सचे काम वेगात सुरु असल्यामुळे याठिकाणी परप्रांतीय लोंढे येण्यास वेळ लागणार नाही, त्यामुळे लोंढे वेळीच रोखले नाही तर पनवेलच्या झोपडपट्टीमध्ये दहशतवादी अड्डे तयार होतील, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांसोबत आयोजित चर्चासत्रात व्यक्त केले. यावेळी झालेल्या चाय पे चर्चे मध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यामध्ये पनवेलचा पाणीप्रश्न, विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्त, पक्षवाढीसाठी करण्यात येणार्या उपाययोजना, रेल्वे स्थानकाबाहेर रात्रीच्यावेळी सुरु असणारा परप्रांतीयांचा हैदोस आदींसह महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी केवळ पत्रकार आणि राज ठाकरे यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही पदाधिकार्याला या चर्चासत्रामध्ये सहभागी करण्यात आले नव्हते.

यावेळी काही पत्रकारांनी पनवेलमध्ये परप्रांतीयांचा हैदोस आणि काही शिक्षण संस्थेद्वारे लहान मुलांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे सांगण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी सांगितल की, असेच लोंढे जर पनवेलमध्ये येत राहिले आणि पनवेलकर गाफील राहिले तर याठिकाणी नवीन झोपडपट्ट्या तयार होऊन त्याठिकाणी बंदुकी बनविण्याचे कारखाने तयार होतील, आणि त्यानंतर पनवेलकर काहीही करू शकणार नाहीत म्हणून वेळीच रोखले नाही तर आतंकवादी अड्डे तयार होण्यास वेळ लागणार नाही.