Fri, Jul 19, 2019 15:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून पॉर्नसाईटवर टाकला

तरुणीचा अश्लील व्हिडिओ बनवून पॉर्नसाईटवर टाकला

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 19 2018 1:13AMनालासोपारा : प्रतिनिधी

वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मित्राने आपल्या मैत्रिणीचा अश्लील व्हिडीओ बनवून इंटरनेटववरील विविध पॉर्न साईटवर अपलोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वालीव पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांंतर्गत मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.  

नालासोपारा येथे राहणारी पीडित 24 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीची 2015 मध्ये उत्तरप्रदेशातील बनारस येथे राहणार्‍या जितेंद्र सिंग याच्याशी फेसबुकवर मैत्री झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. या काळात जितेंद्र पीडित तरुणीला भेटण्यासाठी नालासोपारा येथे यायचा. नायगाव येथे जितेंद्रची बहिण राहते. त्याने तेथे पीडित तरुणीला नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या काळात आरोपीने पीडितेच्या नकळत तिचा अश्लिल व्हिडिओ बनवला. काही कारणास्तव दोघांमध्ये बिनसल्याचा राग धरून आरोपीने 2018 मध्ये तो व्हिडिओ इंटरनेटवरील विविध पॉर्न साईटवर अपलोड केला.

पीडित तरुणीला तिचा अश्लिल व्हिडिओ इंटरनेटवर असल्याचे समजल्यावर तरुणीला धक्का बसला. तिने तत्काळ वालीव पोलीस ठाण्यात आरोपी जितेंद्र सिंगविरोधात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून वालीव पोलिसांनी सिंगविरोधात बलात्कार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही.