Thu, May 28, 2020 13:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा; प्रवाशांचे हाल

सलग तिसऱ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा; प्रवाशांचे हाल

Published On: Jun 12 2019 9:03AM | Last Updated: Jun 12 2019 9:08AM
ठाणे : अमोल कदम

मध्य रेल्वेचे वेळापत्रक आठवड्याच्या तिसऱ्या दिवशीही विस्कळीत झाले. लोकल उशीरा येण्याचे कारण मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र प्रवाशांना आज (बुधवार) सकाळी सात वाजल्यापासून लोकल १५ मिनिटे उशिरा मिळत असल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सोमवार संध्याकाळी पावसाने हजेरी लावताच कोपर स्थानकात कल्याण दिशेकडे जाणाऱ्या लोकलच्या पेंटाग्राफमध्ये स्पार्क होऊन लोकलचा खोळंबा झाला होता. मंगळवारी स्थानक परिसरात कुठलीही उद्घोषणा न होता, लोकल तब्बल अर्धा तास उशिरा धावत होती. तर आठवड्याच्या सलग तिसऱ्या दिवशी आज लोकल तब्बल १५ मिनिटे नियोजित वेळेच्या उशिरा धावत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत असून आजही स्थानक परिसरात लोकल का उशिरा धावत आहे. याबद्दल कुठलीच उद्घोषणा नाही. यामुळे सलग तिसऱ्या दिवशी लोकलमध्ये प्रचंड गर्दीचा सामना करत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.

 यामुळे या दररोजच्या लोकलच्या वेळापत्रकात विलंब होत असल्याने याचा मोठा फटका रेल्वे प्रशासनाला सहन करावा लागेल, असे प्रवासी संतापून सांगत आहेत.