Sun, Nov 18, 2018 09:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोपर्डी : अवघ्या पाच मिनिटात दिला निकाल

कोपर्डी : अवघ्या पाच मिनिटात दिला निकाल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नवी मुंबई: राजेंद्र पाटील    

महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणाचा आज निकाल लागला. अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले या ११ वाजून २३ मिनिटांनी न्यायालयात आल्या. त्यांनी अवघ्या पाच मिनिटात निकालपत्राचे वाचन पुर्ण करून दोषी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे आज निकालाच दिवस असतानाही आरोपीचे वकील न्यायालयात हजर नव्हते.

कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. यामुळे अखेर कोपर्डीच्या चिमुकलीला न्याय मिळाला आहे.

१३ जुलै २०१६ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी एकून ३१ साक्षीदार तपासण्यात आले. 

कोपर्डीतील अत्याचारानंतर संपूर्ण राज्य आणि देशाचे सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले होत. यातील दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मोर्चे काढण्यात आले होते. आज न्यायालयाने निकाल देत आरोपींना फाशीची सुनावल्याने खऱ्या अर्थाने कोपर्डीच्या निर्भयाला न्याय मिळाला असच म्हणाव लागेल.