Sun, May 26, 2019 12:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओखी वादळाचा परिणाम, मध्य रेल्वे उशिराने सुरू

ओखी वादळाचा परिणाम, मध्य रेल्वे उशिराने सुरू

Published On: Dec 05 2017 1:01PM | Last Updated: Dec 05 2017 1:01PM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

ओखी वादळाचा परिणाम मुंबई सह उपनगरात देखील सुरू झाला असून, पडत असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक वीस मिनिटे उशिराने धावत आहे, लोकल मार्गावर कल्याण ते कर्जत, कसारा पर्यंत धुखे पसरले असून पावसामुळे लोकलचा वेग मंदावला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू झाले आहेत.

ओखी वादळाचा परिणाम मुंबई आणि उपनगरांमध्ये जाणवणार असल्याचे हवामान खात्याच्या वतीने सांगण्यात आले होते, त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर परिसरातील शाळा, कॉलेजांना सुट्टी देण्यात आली आहे. परंतु, कार्यालये सूरू असल्याने चाकरमानी घरातून बाहेर पडले आहेत, त्यातच लोकलचे वेळापत्रक कोलमडले असल्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. सतत पाऊस पडत असल्यामुळे संध्याकाळी घरी परतणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडणार आहे.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता रेल्वेच्या वतीने स्थानक परिसरात अतिरिक्त रेल्वे पोलिस बंदोबस्त प्रवाशांच्या मदतीकरिता ठेवण्यात आला आहे. पण लोकल सकाळपासून वीस मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.