Mon, Nov 19, 2018 00:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शरद पवार यांच्याविरोधातील याचिका मागे

शरद पवार यांच्याविरोधातील याचिका मागे

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 25 2018 1:00AMमुंबई : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत माथाडी कामगारांना दोन वेळा मतदान करा, असे वक्‍तव्य केले होते. त्याविरोधात भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका सुनावणी घेण्यास योग्य नसल्याचे न्या. रणजित मोरे आणि न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने स्पष्ट करून, याचिका फेटाळत असल्याचे संकेत दिले. संबंधित विभागाकडे दाद मागावी, असे स्पष्ट केल्याने अखेर याचिकाकर्त्याने याचिका मागे घेतली.