Tue, Mar 19, 2019 20:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मालकाकडे खंडणी मागणार्‍या कामगाराला अटक 

मालकाकडे खंडणी मागणार्‍या कामगाराला अटक 

Published On: Aug 12 2018 1:09AM | Last Updated: Aug 12 2018 12:30AMभिवंडी : वार्ताहर 

झटपट श्रीमंत होण्यासाठी यंत्रमाग कारखाना मालकाकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागणार्‍या कामगारास भोईवाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने रंगेहात पकडले. लल्लनकुमार रामावतार दास (20, रा. मधुबनी बिहार) असे अटक केलेल्या कामगाराचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 13 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. 31 जुलै रोजी त्याने पुन्हा नव्या क्रमांकावरून धमकीसाठी फोन केला असता पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते यांनी त्याच्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक शोधून त्याच्या विरोधात सापळा रचला. 

पोलिसांच्या सांगण्यावरून घरत यांनी 5 ऑगस्टला त्याला कारीवली तलावाजवळ पैसे घेण्यास बोलावले होते. पण, परिसरात पोलीस असल्याचा सुगाव लागल्याने त्याने येणे टाळले उलट घरत यांना पुन्हा फोन करून पोलिसांना बोलावल्याबद्दल पुन्हा धमकावले. तसेच 7 ऑगस्टला सायं. 7 . 30 वा. पाच लाख रुपये घेऊन कारीवली खारबाव रोड वरील मंदिराजवळ घेऊन येण्याचे धमकाविले. 

भोईवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पुजारी, पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते, पोलीस शिपाई संतोष कदम, योगेश कवडे , सुनील साळुंखे, सचिन देसले यांनी संपूर्ण परिसरात सापळा रचून लल्लनकुमारच्या मुसक्या  आवळल्या. लल्लनकुमारने घरत याच्या बंगल्याच्या छतावर पहाटे चारच्या सुमारास जाऊन रेकी केल्याचे त्याच्या चौकशीत पुढे येत आहे. 

भिवंडी तालुक्यातील कारीवली या गावातील गणेश घरत यांचा यंत्रमाग कारखाना असून त्यांच्याकडे मागील दोन वर्षांपासून लल्लनकुमार हा कामगार म्हणून काम करीत होता. सहा महिन्यांपूर्वी त्याने आपल्या मालकाचा मोबाईल क्रमांक मिळवत त्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत दहा लाख रुपयांनी खंडणी मागितली. याबाबत गणेश घरत यांनी सभोईवाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. गेले सहा महिने तो सीमकार्ड बदलून घरत यांना धमकावत होता. त्यांच्या कुटुंबियांना मारण्याची धमकी देत होता.