Fri, May 24, 2019 03:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : जुना पत्री पूल वाहतुकीसाठी बंद

ठाणे : जुना पत्री पूल वाहतुकीसाठी बंद

Published On: Aug 18 2018 4:27PM | Last Updated: Aug 18 2018 4:25PMठाणे : प्रतिनिधी

जुना पत्री पूल सर्व प्रकारच्या वाहनांना ये जा करण्यास बंद करण्यात आला असल्याची अधिसूचना ठाणे शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी काढली आहे.

कल्याण पूर्व कोळसेवाडी सूचक नाका येथून पत्री पुलावरून गोविंदवाडी बायपास दुर्गाडीच्या  दिशेने जाणाऱ्या तसेच दुर्गाडी कडून सूचक नाकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना व पादचाऱ्यांना जुना पत्री पूल बंद करण्यात आला आहे. या पुलावरील सर्व वाहतूक आता नवीन पत्री पुलावरून करण्यात आली आहे. तर, जड-अवजड वाहनांची वाहतूक ही नवीन पत्री पुलावरून रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेतच होईल.

मध्य रेल्वे आणि राज्य रस्ते विकास महामंडळाने जुना पत्री पूल सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्णत: बंद करावा अशी सुचना केली होती. यापूर्वी जुना पत्री पूल हा हलक्या वाहनांसाठी सुरु ठेवण्याची अधिसूचना जुलैमध्ये वाहतूक विभागाने काढली होती, परंतु आता या पुलावरील संपूर्ण वाहतूकच बंद ठेवण्यात येणार आहे.