Wed, Dec 19, 2018 21:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जेईई देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या घटली

जेईई देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या घटली

Published On: Jan 07 2018 2:02AM | Last Updated: Jan 07 2018 1:23AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

देशभरातील 23 आयआयटीमधील एकूण 10 हजार 988 जागांपैकी यंदा 121 जागा रिक्त राहिल्या असून गेल्यावर्षी हे प्रमाण 26 इतके होते. त्या अगोदर हे प्रमाण 50 जागा शिल्लक राहिल्या होत्या. तर यंदा जेईई परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे.

देशभरातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत असनाना आता त्याचा फटका गलेलठ्ठ पगार देणार्‍या अभ्यासक्रम असणार्‍या आयआयटीच्या संस्थानाही बसत आहे. आयआयटी प्रवेशासाठी घेण्यात येणार्‍या जेईई सारख्या प्रवेश परीक्षेची काठीण्य पातळी याला कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे. 

विद्यार्थ्यांना कोणत्या संस्थेमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे, हे त्यांनी ठरविले असते. हे निवडताना तेथे असलेल्या सोयी सुविधांचा विचार करूनच विद्यार्थी आपला निर्णय घेत असतात. त्यामुळे ते त्यांनी निवडलेल्या पर्यायांपैकी इतर पर्यायांना प्राधान्य देत नाहीत.  त्यांना त्यांच्या आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश नाही मिळाला तर ते वेगळ्या पर्यायांचा विचार करत असल्याचे आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. देवांग खक्कर यांनी सांगितले.

राज्याची संख्या निम्यावर

महाराष्ट्रातून जेईई मेनच्या परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेतली तर वरील बाब समोर येते. 2018 साली होणार्‍या परीक्षेसाठी यंदा राज्यातून फक्त 1.63 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 2015 साली हा आकडा 2.46 लाख इतका होता. यावर्षी ही परीक्षा देणार्‍यांची संख्या घसरली आहे.