Mon, May 20, 2019 10:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गिरगांव चौपाटीवर उभारणार मराठी रंगभूमीचे स्मारक 

गिरगांव चौपाटीवर उभारणार मराठी रंगभूमीचे स्मारक 

Published On: Jun 16 2018 1:41AM | Last Updated: Jun 16 2018 1:35AMमुंबई : खास प्रतिनिधी

समाजाचा आरसा दाखविणार्‍या मराठी नाटकांची 175 वर्षांची परंपरा, त्याचा इतिहास दाखविणारे मराठी रंगभूमीचे स्मारक मुंबई महापालिकेतर्फे  गिरगांव चौपाटीवर उभारण्याची घोषणा करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात मराठी नाटकांना वैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसेना-भाजपची सत्ता असो वा नसो, मराठी माणूस म्हणून मराठी माणसाची संपूर्ण ताकद तुमच्या पाठीशी उभी केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द दिला.

अवघ्या दोन महिन्यांच्या तयारीत यशस्वीपणे पार पडलेल्या आणि पहिल्यांदाच सलग 60 तास झालेल्या मुलुंड येथील 98 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा आज  अपेक्षेनुसार समारोप झाला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख     पान 1 वरून... उद्धव ठाकरे यांनी सुरूवातीलाच बांद्रा येथील बालगंधर्व नाट्य मंदिरात मराठी नाटके व्हावीत आणि बाहेरील कलावंतासाठी मुंबईत राहण्याची व्यवस्था (आश्‍वास बेटांची) करण्याची संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांची मागणीही मान्य केली. कार्यक्रमास्थळी तब्बल दीड तास उशिरा येऊनही मराठी माणसाविषयी शिवसेनेची आजही भूमिका तशीच आहे, हे ठाकरे शैलीत सांगून  उध्दव ठाकरे यांनी रसिकांची मने जिंकून घेतली. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार, स्वागताध्यक्ष नामदार विनोद तावडे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी होते.

आता काळ बदलत आहे. बटाट्याच्या चाळ हे नाटक आता यु ट्यूबवर पाहिले जाते. आता मुंबईतील कितीतरी चाळी नामशेष झाल्या आहेत. परंतु बटाट्याच्या चाळीला मेट्रो येवो वा कुणी शक्का लावू शकत नाही, असे त्यांनी सांगितली. महाराष्ट्रतील लोककलेचे, परंपरेचे दर्शन संमेलनाच्या निमित्ताने तीन दिवस मुंबईकरांना घडले. मुंबईच्या कोणत्याही पिढीला वासुदेव विचारला तर तो नाक्यावर उभा राहतो एवढेच माहित आहे.  निकाल सांगणारा गुबूगुबवाला नंदीबैल, वाघ्यामुरली आदी कधीच मुंबईतून हद्दपार झाले आहेत, त्यांना  मुंबईत चांगले ठिकाण द्यायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून  बाहेरून मुंबईत येणार्‍या मराठी कलावंतासाठी मुंबई महापालिकेतर्फे अंधेरीमधील शहाजी राजे क्रीडा संकुलात व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.

राजकारण्यांवरून होणारा वाद चुकीचा - सुशीलकुमार शिंदे 

नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरील राजकारणाच्या वावराचे समर्थन करताना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 1943 मध्ये झालेल्या पहिल्या मराठी नाटकाच्या शतकोत्सवी प्रयोगाचे अध्यक्ष राजकारणी स्वातंत्र्यवीर सावरकर होते, हे उदाहरण देत मंत्री, खासदार, आमदारपदावर राहून लाखो प्रेक्षकांना झुलवणे हे आमच्या कला असल्याशिवाय होत नाही. हे  शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारा असे म्हणतात सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. आपल्या भाषणादरम्यान शिंदे यांनी नर्म विनोदाची पेरणी केली.

बॅकस्टेज कलाकारांचा काढणार वैद्यकीय विमा - विनोद तावडे

मराठी नाटकांमधील बॅकस्टेज कलाकरांच्या आरोग्याचा प्रश्‍न कायमचा निकाली काढण्यासाठी राज्य सरकारतर्फे त्या कलाकारांचा मेडिक्‍लेम काढण्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री तथा स्वागताध्यक्ष विनोद तावडे यांनी करून समांतर रंगभूमीसाठी नाट्य परिषदेने आराखडा बनविण्याची सूचना केली.