Thu, Jun 20, 2019 01:26



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महत्प्रयासाने घडले रक्‍तवर्णी चंद्रदर्शन 

महत्प्रयासाने घडले रक्‍तवर्णी चंद्रदर्शन 

Published On: Jul 28 2018 2:01AM | Last Updated: Jul 28 2018 1:52AM



मुंबई : प्रतिनिधी

एकविसाव्या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण शुक्रवारी रात्री पावसाची रिमझिम आणि ढगाळ वातावरण असतानाही शहरातील खगोलप्रेमींनी पाहिले.

रात्री पावणेबारानंतर सुरू झालेले चंद्रग्रहण ढगाळ वातावरणाने सहजासहजी दिसत नव्हते. हौशी मंडळींनी टेरेसवर दुर्बिणीच्या माध्यमातून चंद्रग्रहण  पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र, ढगाळ वातावरणामुळे ग्रहण दिसले नसल्याने त्यांची निराशा झाली. अनेक ठिकाणी दुर्बिणींची व्यवस्था करण्यात आल्याने ग्रहणाच्या छटा टिपता आल्या. चंद्राचा लहान आकार व रक्‍तासारख्या लाल रंगामुळे मायक्रोमून व ब्लडमून अशा विलोभनीय दृश्यांची अनुभूतीही काही खगोलप्रेमींना घेता आली.

ग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमींनी रात्र जागून काढल्याचे दिसत होते. मायक्रोमून व ब्लडमून पाहून त्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत होते. जगातले सर्वात मोठे चंद्रग्रहण असल्याने सर्वसामान्यांनाही याबाबत उत्सुकता होती. त्यामुळे अनेकांनी हे ग्रहण पाहण्यासाठी टेरेसवर दुर्बिणीच्या माध्यमातून ग्रहण पाहण्याचा प्रयत्न केला.