Fri, Apr 26, 2019 15:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मूल होत नसल्याने विवाहितेचा छळ

मूल होत नसल्याने विवाहितेचा छळ

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 12:50AMमुंबई : प्रतिनिधी

मूल होत नसल्याने पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केल्याची घटना दहिसरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करुन एमएचबी पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.विवाहानंतर सासरी राहण्यास आलेल्या  पीडित विवाहितेकडून सासूने लाखो रुपयांचे दागिने काढून घेत लॉकरमध्ये नेऊन ठवले. सण असला तरी सासूने हे दागिने घालण्यासाठी दिले नसल्याचाही आरोप विवाहितेने केला आहे. दरम्यान वैद्यकीय तपासणीत विवाहितेला आई बनणे घातक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तसेच पती अरुण यालाही वैद्यकीय समस्या असल्याचे सांगितले. त्यामुळे पती रोज दारुच्या नशेत घरी येऊन तिचा शारिरीक आणि मानसिक छळ करु लागला. मात्र पीडिता हे अत्याचार निमूटपणे सहन करत होती.

पतीचे अन्य महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती विवाहितेला दरम्यानच्या काळात समजली. पतीला विचारणा केली असता त्याने मारहाण करुन चांगली वागणूक देण्यासाठी 5 लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. गेल्यावर्षी पतीने मारहाण करुन घरातून हाकलून दिल्यानंतर ही बाब तिच्या माहेरच्या मंडळींना समजली.  काही महिन्यांनंतर वडिलांसोबत ही विवाहिता सासरी आली असता घरामध्ये एक महिला पतीसोबत त्यांना दिसली. यावरुन दोन्ही कुटुंबात कडाक्याचे भांडण झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर पिडीतेच्या वडिलांनी एमएचबी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पुन्हा बैठका होऊन सामंजस्याने हा प्रश्‍न मिटल्यानंतर महिनाभराने विवाहिता सासरी परतली. काही महिने शांततेत गेल्यानंतर 7 एप्रिलाला पतीसोबत आणखी एक तरुणी घरी आली. यावरुन पुन्हा वाद होऊन हे वाद पोलीस ठाण्यापयर्ंंत पोहचले. विवाहितेने वडिलांसोबत पोलीस ठाणे गाठून पुन्हा तक्रार दिल्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला घरात घेतले नाही. अखेर माहेरी निघून गेलेल्या विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दिली आहे. 

Tags : Mumbai, incident,  persecution,  husband , law, husband, law,  husband, due, lack, children