Wed, Nov 14, 2018 03:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चॅटिंगला विरोध करणार्‍या पतीचा पत्नीकडून खून

चॅटिंगला विरोध करणार्‍या पतीचा पत्नीकडून खून

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 02 2018 1:24AMकल्याण : प्रतिनिधी

मोबाइलवर पत्नी सतत चॅटिंग करत असल्याने पती-पत्नीमध्ये होत असलेल्या भांडणातून पत्नीने पतीच्या हत्येसाठी तीस लाख रुपयांची सुपारी देऊन त्याची हत्या केल्याची गंभीर घटना कल्याणमध्ये घडली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी सुपारीबाज पत्नीसह सुपारी घेणार्‍या एका आरोपीस अटक केली असून त्याच्या सहकारी आरोपींचा शोध सुरू आहे. कल्याण पूर्वेकडील तिसगाव परिसरात राहणारा शंकर गायकवाड हा इसम बेपत्ता झाल्याची तक्रार त्याची पत्नी आशा गायकवाड हिने 20 मे रोजी कोळसेेवाडी पोलीस ठाण्यात केली होती.

शंकरचा निर्घूण खून होऊन कोळसेवाडी पोलिसांना त्याचा मृतदेह नेरळ येथे सापडला होता. या हत्येचा उलगडा करण्याचा प्रयत्न पोलीस करीत होते. दरम्यान, पोलिसांनी मयताच्या कुटुंबीयांची कसून चौकशी केली असता त्यांना त्याच्या पत्नीचा संशय आला. त्यानंतर त्यांनी आपला तपास आशा हिच्यावरच केंद्रीत केला. त्यावेळी  तिने पतीच्या हत्येसाठी तीस लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची माहिती पोलिसांना दिली.

हत्येसाठी सुपारीच्या ठरलेल्या रकमेपैकी चार लाख रुपये आगाऊ रक्कम देण्यात आली होती. मयताची पत्नी आशा ही सतत मोबाइलवर चॅटिंग करीत असल्याने तिचे पती शंकर याच्याशी भांडण होत असे. त्यातूनच आशा हिने शंकरची हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. कोळसेवाडी पोलिसांनी मयताची पत्नी आशा व सुपारी घेणारा आरोपी हिमांशू दुबे याला अटका केली असून या हत्येत सहभागी असलेल्या अन्य आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.