Sun, Nov 18, 2018 04:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात चर्मकार आयोग स्थापन करणार : मुख्यमंत्री

राज्यात चर्मकार आयोग स्थापन करणार : मुख्यमंत्री

Published On: Sep 01 2018 5:39PM | Last Updated: Sep 01 2018 5:39PMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील चर्मकार समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी लवकरच राज्यात चर्मकार आयोग स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शनिवारी (दि. १ सष्टेंबर) मुंबई येथे केली.

रोहिदास समाज, पंचायत समाज संघाच्या वतीने परळ येथे उभारण्यात येत असलेल्या संत रोहिदास भवन भूमिपूजन आणि कोनशीलेचे उद्घाटन आज, शनिवारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना त्यांनी राज्यात चर्मकार आयोग स्थापन करणार असल्याची घोषणा केली. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संत रोहिदास यांच्या कार्याला आणि विचारला समर्पित असे स्मारक मुबंईत उभे राहत आहे. देशात रोहिदास यांनी समतेची परंपरा सुरू केली. आणि त्याच माध्यमातून समाज एकत्रीत केला. त्यांनीच देशात आपल्या काव्यातून 'सबका साथ सबका विकास' हा संदेश दिला होता. समताधिष्ठित राज्याचा त्यांचा विचार होता त्याच विचारावर आपले सरकार चालत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या भवनासाठी सरकारने आता ११ कोटी रुपये दिले असले तरी त्यानंतरही निधीची गरज पडल्यास सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.