Mon, May 20, 2019 10:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सहकारमंत्र्यांच्या बंगल्याचा वाद नगरविकास मंत्रालयाच्या दारात

सहकारमंत्र्यांच्या बंगल्याचा वाद नगरविकास मंत्रालयाच्या दारात

Published On: Jun 18 2018 1:10AM | Last Updated: Jun 18 2018 12:31AMमुंबई ः विशेष प्रतिनिधी

सोलापूर शहरातील होटगी रस्त्यावर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह नऊ जणांनी बांधलेल्या अनधिकृत बंगल्याचा वाद आता मंत्रालयात पोहचला आहे. सोलापूर महापालिका आयुक्तांनी बंगला बेकायदेशीर ठरवल्याच्या निर्णयाविरोधत इगा पुरुषोत्तम, शरद ठाकरे आणि सिध्दार्थ चिट्टे यांनी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे अपील केले आहे. 

सोलापूरमधील सामाजिक कार्यकर्ते महेश चव्हाण यांनी या अनधिकृत बांधकामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल केलेली असताना राज्यमंत्र्यांनी याप्रकरणी अपील दाखल करुन घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोलापूर महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी उच्च न्यायालयात 30 मे रोजी अहवाल सादर करुन त्यामध्ये सुभाष देशमुख यांच्यासह नऊ रहिवाशांची बांधकामे ही अग्नीशमन दल, उद्यान, भाजी मार्केट, शॉपींग सेंटरसाठी राखीव ठेवलेल्या जागेवर करण्यात आली असून सदर बांधकामे अनधिकृत व बेकायदेशीर ठरतात, असे स्पष्ट म्हटलेले आहे. 

दहा अनधिकृत बांधकाम धारकांनी आता नगरविकास राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्या कार्यालयात 13 जून रोजी अपील दाखल केले असता त्यावर त्यांनी दुसर्‍या दिवशी सुनावणी देखील घेतली व सोलापूर महालिका आयुक्त यांना या प्रकरणाची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण नाजुक असल्यामुळे डॉ. पाटील यांच्याऐवजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे स्वतः हे प्रकरण हाताळण्याची शक्यता आहे.