Tue, Mar 19, 2019 20:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबई महापालिका शाळेचे गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यूबे

नवी मुंबई महापालिका शाळेचे गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यूबे

Published On: May 26 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 1:01AMलापूर : वार्ताहर 

कोपरखैरणेतील बोनकोडे येथे शुक्रवारी महापालिकेने 40 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या शाळेचे लोखंडी गेट अंगावर पडून पाचवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सौरभ चौधरी (12) असे मृताचे नाव असून त्याचा मित्र निलेश जखमी झाला आहे. वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी बांधकाम ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या इमारतीमधील शाळा जूनमध्ये सुरु होणार होती. मात्र, त्यापूर्वीच ही घटना घडल्याने इमारतीच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सौरभ, निलेश  व त्याचा मित्र पालिका शाळेच्या आवारात क्रिकेट खेळत होते. यावेळी शाळेच्या आवारात रिक्षा उभी करण्यासाठी चालकाने शाळेचे गेट उघडले. परंतु, ते बंद करण्यास सौरभ व त्याचे मित्र गेले असता ते त्यांच्या अंगावरच कोसळले. यामध्ये सौरभ व त्याचा मित्र निलेश गंभीर जखमी झाले. 

जखमींना वाशीत महापालिका रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, सौरभची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला फोर्टीस रुग्णालयात हलवले. मात्र, तेथे बेड रिकामी नसल्याचे सांगण्यात आले. पालिकेतून पाठवले असून सौरभची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून देखील त्याला दाखल करून घेण्यात उशीर केला गेला. यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने सौरभचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याचे मामा संतोष पाटील यांनी केला आहे. तसेच शाळेच्या गेटचे काम निकृष्ट झाल्याने ते कोसळले, याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई करा, अशी मागणीही केली आहे