होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून तरुणाची निर्घृण हत्या

पत्नीशी अनैतिक संबंध; तरुणाची निर्घृण हत्या

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 1:41AMमुंबई : प्रतिनिधी

पत्नसोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातून 30 वर्षीय आरोपीने त्याच्या साथीदारांच्या मदतीने 21 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करुन निर्घृण हत्या केल्याची धक्‍कादायक घटना बुधवारी कुर्ला रेल्वे ट्रक यार्डजवळ घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन नेहरुनगर पोलिसांनी अंकुश पांढरे याला बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याच्या दोन साथीदारांना शुक्रवारी ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु केली आहे.

कुर्ला पुर्वेकडील साबळे नगरपत्रा चाळ गल्लीमध्ये कुटुंबासोबत राहात असलेल्या जगन्नाथ शिंगाडे (21) या तरुणाला बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास काही जणांनी रेल्वे ट्रॅक यार्डजवळ बोलावून घेतले. शिंगाडे तेथे पोहचल्यानंतर पांढरे याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने धारदार शस्त्राने सपासप वार करुन त्याची निर्घृण हत्या केली. हत्येची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या नेहरुनगर पोलिसांनी जगन्नाथचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून त्याचे वडील नामदेव यांना जबाब नोंदवून घेतला आहे.

नामदेव यांच्या जबाबावरुन याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी सुरू केलेल्या तपासात ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. मृत तरुण शिंगाडे याचे एका आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. यातूनच शिंगाडेचा काटा काढल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी पांढरे याला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीतून दोघांची नावे समोर आल्याने त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags : Mumbai, cruel, assassination, young, man, rage, having, sexual, relations, wife.