Tue, May 21, 2019 22:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आयुक्‍त मुंढेंनी मागितली न्यायालयाची बिनशर्त माफी

आयुक्‍त मुंढेंनी मागितली न्यायालयाची बिनशर्त माफी

Published On: May 26 2018 1:19AM | Last Updated: May 26 2018 1:04AMमुंबई : प्रतिनिधी 

उच्च न्यायालयाचा मनाई आदेश असताना नाशिक महापालिकेच्या हद्दीतील गोदावरीच्या तीरावरील बेकायदा बांधकाम तोडल्याचे प्रकरण भोवल्यानंतर पालीका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घडल्या प्रकाराबद्दल शुक्रवारी न्यायालयाची बिनशर्त माफी मागितली. उच्च न्यायालयाचे न्या. एस. एच काथावाला व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने याची दखल घेऊन न्यायालयाच्या आदेशापूर्वी पाडण्यात आलेली बांधकाम पालिकेने  तात्काळ स्वखर्चात उभारावीत, असा आदेश पालीकेला दिला.

उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेश असताना पालीकेने बांधकामा विरोधात कारवाई केल्यानेअभिजित पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊ याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्या.काथावाला व न्या. अजय गडकरी यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकेची दखल घेऊन  पालीका आयुक्तांना आज न्यायालयात हजर रहाण्याचे आदेश दिले होते. मात्र पालीका आयुक्त तुकाराम मुंढे गैरहजर राहिले . हायकोर्टाने  या प्रकरणी संताप व्यक्त केला. कोर्टाने स्थगितीचे आदेश दिलेले असताना पुढच्या दोन तासांत पालिकेच्या अभियंत्यांनी कारवाई कशी काय केली? असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.पालीकेने केलेली कारवाई ही न्यायालयाने  दिलेल्या आदेशांचा अवमान आहे असे स्पष्ट करून न्यायालयाने पालीका आयुक्तां विरोधात न्यायालयाचा अवमाना केल्या प्रकरणी नोटीस बजावून आज दुपारी तिन वाजता न्यायालयात हजर रहाण्याचे आदेश दिले. त्यानुसार मुंढे यांनी दुपारी 3 वाजता न्यायालयात हजर राहून झालेल्या प्रकाराची न्यायालयात बिनशर्त माफी मागितली. याची दखल घेऊन न्यायालयाने अवमान नोटीस रद्द करून पालिकेनं पाडलेली संरक्षक भिंत आणि एक ओटा याच्या पुनर्बांधणीचं काम पालिकेनं स्वखर्चातून तातडीनं सुरू करावं असे निर्देश हायकोर्टानं देत या प्रकरणाची सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली.